गुटख्याच्या पाकिटावरून हल्लेखोराला केले गजाआड

जयपूर-वांद्रे एक्सप्रेसमध्ये व्यावसायिकावर हल्ला प्रकरणी एकाला रेल्वेच्या गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांना घटनास्थळी गुटख्याची पाकीट मिळाली. त्यावर गुजराती भाषेत अक्षरे होती. पोलिसांचे पथक सुरत येथे येथे गेले. तेथून एकाला अटक केली. दुसऱयाचा पोलीस शोध घेत आहेत.

जोगेश्वरी येथे राहणारे तक्रारदार पत्नी आणि मुलासोबत जयपूर -वांद्रे एक्सप्रेसने प्रवास करत होते. बोरिवलीनंतर एक्सप्रेसचा वेग कमी झाला. तेव्हा एक्सप्रेसमधील दोघांनी त्याना चाकूचा धाक दाखवून साहित्य चोरण्याचा प्रयत्न केला. तक्रारदार याने प्रतिकार केला. चोरटय़ाने तक्रारदाराशी झटपट केली. झटापटीनंतर चोरटे हे जोगेश्वरी स्थानक येथे उडी मारून पळून गेले. त्या बॅगेत 7 लाखांचे दागिने होते. तपासात पोलिसांना गुटख्याची पाकिटे आणि काचेचे तुकडे सापडले. त्या गुटख्याच्या पाकिटावर गुजराती अक्षरे होते. त्याआधारे पोलीस सुरत येथे गेले. सुरत येथे काही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्या फुटेजवरून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. अटक केलेला आरोपी हा हरियाणाचा रहिवाशी आहे. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.