परप्रांतीयांसाठी रेल्वे चालविणार आणखी जादा गाड्या

मुंबईला उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल येथून येण्यासाठी होणारी गर्दी पाहून 120 दिवसांचा आगाऊ रिझर्व्हेशन कालावधी असलेल्या आणि तत्काल तिकिटांची सोय असलेल्या आणखी विशेष गाडय़ा चालविण्याची तयारी रेल्वेने केली आहे. तसेच या गाडय़ांना ‘तत्काल’ कोटाही देण्यात आला असून, लवकरच या गाडय़ांची घोषणा होणार आहे.

उत्तरेकडील राज्यांत रोजगाराचे वांदे झाल्याने परप्रांतीयांची मुंबईत पुन्हा परतण्यास गर्दी होत असल्याचे पाहून सॅनिटाइज केलेल्या डब्यांच्या आणखी जादा गाडय़ा रेल्वे सोडणार आहे. रेल्वेने 15 जूनपासून 200 वेळापत्रकीय लांब पल्ल्याच्या गाडय़ा सोडल्या आहेत. यांतील मुंबईसाठी 14 दैनदिन गाडय़ा, तर एक साप्ताहिक ट्रेन आहे. या 200 वेळापत्रकीय गाडय़ांच्या अतिरिक्त या गाडय़ा असणार आहेत.

येत्या सात ते दहा दिवसांत निर्णय
या गाडय़ांचे थांबे आणि भाडय़ाबाबत कोणतीही अधिकृत माहिती रेल्वेने अजून जारी केलेली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. गाडय़ांची गरज, भारमान आणि कोविड-19बाबतची सद्यःस्थिती यांचा अभ्यास केल्यानंतर याचे प्लॅनिंग ठरणार आहे. येत्या आठवडय़ात किंवा 10 दिवसांत याचा निर्णय होणार असल्याचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या