रेल्वेच्या एसी, स्लीपर वेटींग लिस्टला 25 टक्क्यांची मर्यादा

ac-local-train

रेल्वेच्या स्लीपर कोचपासून ते वातानुकूलित कोचच्या श्रेणीतील आरक्षण प्रणालीत आता ‘वेटिंग लिस्ट’ला नवीन मर्यादा आखण्यात आली आहे. सुधारित प्रणालीनुसार, प्रत्येक स्टेशन त्या ट्रेनसाठी वाटप केलेल्या सामान्य कोटय़ापेक्षा फक्त 25 टक्के जास्त प्रतीक्षा यादीतील तिकिटे देऊ शकणार आहे. सोमवारपासून हा नवीन बदल लागू केला आहे. रेल्वे प्रशासनाने अलीकडेच तत्काळ तिकिट बुकिंगसाठी 1 जुलैपासून आधार नंबर अपडेट करणे अनिवार्य केले आहे.