
आयपीलचा अंतिम सामना आज अहमदाबाद च्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार होता. मात्र अहमदाबाद मध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने सामना अद्याप सुरू झालेला नाही. त्यात अहमदाबाद मधील पाऊस कमी होणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता आयपीएलचा सामना सोमवारी होणार असे बोलले जात आहे.
जर सामना 9.40 वाजता सुरू झाला, तर पूर्ण षटके टाकली जातील. दोन्ही संघ 20-200षटके खेळतील. तसे न झाल्यास ओव्हर कटिंग सुरू होईल. आज सामना न झाल्यास सोमवारी (29 मे) पुन्हा सामना खेळवला जाईल. सोमवारीही पावसामुळे सामना झाला नाही, तर साखळी फेरीअखेर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असणारा गुजरात टायटन्सचा संघ हा सामना जिंकेल. चेन्नई सुपर किंग्जसाठी ही वाईट बातमी असेल.