
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात मॉकड्रीलची तयारी सुरू असतानाच आज अवकाळी पावसाने अचानक मॉकड्रील केले. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. तापमानाचा पारा अनेक जिल्ह्यात चाळीस पार गेला आहे. पावसामुळे अचानक वातावरणात गारवा जाणवू लागल्याने लोकं सुखावली. मात्र अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा मात्र चिंतेत आहे.
मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावासामुळे मुंबईकरांची धांदल उडली. pic.twitter.com/Uu5RPbUSpt
— Saamana Online (@SaamanaOnline) May 6, 2025