मुंबईच्या एसी लोकलमधून कोसळू लागल्या धारा, प्रवाशांचे हाल; पहा व्हिडीओ

रविवारीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवार सकाळी मुंबईच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, एसी लोकल ट्रेनमधून समोर आलेल्या एका व्हिडिओने प्रवाशांमध्ये संताप उसळला आहे.

एकीकडे ट्रेनमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यात आता एसी लोकलही गळत असल्याने प्रवाशांचे हाल आणखी वाढले आहेत. सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यावर रेल्वे प्रशासनाने उत्तरही दिली आहे.

‘जय हो’ नावाच्या एका युजरने हा व्हिडिओ एक्सवर वर शेअर केला. “ही आहे मुंबईची एसी लोकल… सगळं पावसाचं पाणी आत येतंय. यासाठीच आपण एवढे पैसे देतो का? असा सवाल करत या युजरने रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे यांना टॅग केले.

रेल्वेप्रशासाने ही तक्रार स्विकारली असून आवश्यक कारवाईसाठी ती मुंबई विभाग ही तक्रार पाठवली आहे. या घटनेमुळे मुंबईच्या लोकल रेल्वे प्रणालीची देखभाल आणि पावसाळ्यातील तयारीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रवाशांना आरामदायक प्रवासासाठी सुरू करण्यात आलेल्या एसी लोकल आता पावसापासूनही संरक्षणही देऊ शकत नाही, अशी टीका सोशल मीडियावर होत आहे.