रायपूरमध्ये ट्रक आणि ट्रेलरची धडक, 13 जणांचा मृत्यू; रस्त्यावर पडला रक्त मांसाचा सडा

छत्तीसगढची राजधानी रायपूरमध्ये एका ट्रक व ट्रेलरची धडक होऊन भीषण अपघात झाला असून यात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर रस्त्यावर रक्त मांसाचा सडा पडला होता. घटनास्थळाची परिस्थती पाहून पोलिसही हादरले. या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

छट्टीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी चातौड गावचे रहिवासी बाना बनारसी येथे गेले होते. तिथून परतत असताना रायपूर बलौदबाजार रस्त्यावर सारागावजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या ट्रेलरला धडक दिली. या अपघातात 13 जण जागीच मृत्युमुखी पडले तर 12 जण जखमी झाले. जखमींमध्ये मृतांचा आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. अपघातातील जखमींवर आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.