प्रमोद महाजनांनी सांगितलेला एक किस्सा यावेळी राज ठाकरे यांनी सांगितला. 84-85ची गोष्ट असेल. बाळासाहेब कलानगरात फेऱया मारायचे. एके दिवशी महाजन त्यांच्यासोबत होते. तेव्हा त्यांना ते म्हणाले, देशातल्या हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावीन आणि हिंदू मतदार तयार होतील. त्यावर हे शक्य नाही असे महाजन म्हणाले असता, तू मला ओळखत नाहीस, असे बाळासाहेबांनी सांगितले आणि नंतर बाळासाहेबांनी ते जे बोलले ते करून दाखवले. या देशात हिंदू एक राजकीय शक्ती बनू शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. तोपर्यंत असं काही होऊ शकतं याची या देशात कुणाला कल्पनाही नव्हती. अगदी भाजपलाही, अशी आठवण राज यांनी सांगितली.



























































