Video – कोण जैन लोक आहेत, जे कबुतरावर बसून फिरायला जातात? राज ठाकरे यांचा टोला

तुमच्या घरात चार उंदीर झाले. त्याचं काय करता तुम्ही… गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का. नाही ना. कोण जैन लोकं आहेत जे कबुतरांवर बसून फिरायला जातात. काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. माणसं मेली तर चालतात. रेल्वेखाली माणसं जातात, खड्ड्यांमध्ये माणसं जातात. माणसांपेक्षा कबूतर महत्त्वाचे आहेत का, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.