
वेदांता फॉक्सकॉननंतर आता एअरबसचा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातकडे गेला. त्यावरून सध्या राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
”महाराष्ट्रात येणारे अनेक प्रकल्प गुजरातला जात आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. जो प्रकल्प येतोय गुजरातला जातोय. याकडे पंतप्रधानांनी लक्ष द्यायला हवं. पंतप्रधान हे देशाचे आहेत. त्यांना सर्व राज्य़ ही समान असायला हवीत”, असे राज ठाकरे म्हणाले.



























































