मनसे निवडणूक लढवणार 5 ऑक्टोबरपासून प्रचाराची सुरुवात

17608

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 5 ऑक्टोबरपासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. किती आणि कुठल्या जागा लढवणार याबाबत योग्य केळी सांगेन असे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता मनसेने काँग्रेस-राष्ट्रावादी आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनसे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एमआयजी क्लब, वांद्रे येथे सोमवारी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली. यावेळी मंत्रालयात आत्महत्या करणार्‍या धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी मनसेत प्रवेश केला. त्यांना विधानसभेची उमेदवारी देणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या प्रचारसभेची जागा अद्याप ठरली नाही, मात्र 5 तारखेपासून प्रचाराची सुरुवात होईल हे निश्चित. इतके दिवस जे बोललो नाही ते आता बोलणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. लोकसभा निकडणुकीच्या दरम्यान राज ठाकरे यांनी युतीच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला होता. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या विरोधात भूमिका घेतली होती.

 

आपली प्रतिक्रिया द्या