जयगड किल्ल्याच्या बुरूजाला तडे, अधिवेशनात लक्षवेधी मांडणार – उपनेते आमदार राजन साळवी

जयगड येथील किल्ल्याच्या बुरूज आणि तटाला तडे गेले आहेत. जेएसडब्ल्यू कंपनी जयगड खाडीत ड्रेजिंग करत आहे. त्या ड्रेजिंगच्या कंपनामुळे जयगड किल्ल्याच्या तटाला तडे गेले आहेत. शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांनी आज जयगड किल्ल्याची पहाणी केली. सोमवार पासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात जयगड किल्ल्याच्या दुरावस्थेबाबत लक्षवेधी मांडणार असल्याचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.

इतिहासाची साक्ष देत जयगड किल्ला अनेक वर्ष उभा आहे. जयगड किल्ल्याच्या बुरूजाला आणि तटाला तडे गेले आहेत.केंद्रीय पुरातत्व विभागाकडे वारंवार तक्रारी करून देखील पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत आहे. जेएसडब्ल्यू कंपनी जयगड खाडीत ड्रेजिंग करत आहे. त्याच्या कंपनामुळे जयगड किल्ल्याला तडे गेले आहेत. जयगड खाडी बचाव कृती समितीच्या वतीने ग्रामपंचायत सदस्या देवयानी खाडे यांनी जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांना ड्रेजिंगचे काम थांबविण्यात यावे या मागणीचे पत्र दिले आहे. त्यानंतर शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांनी आज जयगड किल्ल्याची पहाणी केली. सोमवार पासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात जयगड किल्ल्याच्या दुरावस्थेबाबत लक्षवेधी मांडणार असल्याचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे, विभागप्रमुख उदय माने,संतोष हळदणकर आणि ग्रामपंचायत सदस्या देवयानी खाडे उपस्थित होत्या.