
मुंबईहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्प्रेएसला गुजरातमधील वलसाडजवळ अपघात झाला. अज्ञातांनी रेल्वे रुळावर आडव्या टाकलेल्या सिमेंटच्या खांबाला एक्प्रेस धडकली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल केला असून ही एक्प्रेस गाडी रुळांवरून घसरण्यासाठी हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.

























































