राजेश कुमार मीना राज्याचे मुख्य सचिव

राज्याचे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक या उद्या सोमवारी निवृत्त होत आहेत. त्यामुळे मुख्य सचिवपदी राजेश कुमार मीना यांची नियुक्ती झाली आहे.

राजेश कुमार मीना महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. ते उद्या संध्याकाळी चार वाजता  मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारतील. राज्याच्या मुख्य सचिवपदाच्या स्पर्धेत गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबालसिंह चहल आणि पालिका आयुक्त भूषण गगरानी यांची नावे होती. 1988च्या बॅचचे मीना हे ऑगस्ट 2025मध्ये निवृत्त होणार आहेत. पण आगामी पालिका निवडणुका लक्षात घेता त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.