मॅन व्हर्सेस वाईल्ड शूटिंग दरम्यान ‘रजनीकांत’ जखमी

1800

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत बेअर ग्रील्स याच्या ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या शोमध्ये दिसणार आहे. डिस्कव्हरी वाहिनीवर प्रसारित होणार्‍या या शोच्या पहिल्या एपिसोडच्या शूटिंग दरम्यान रजनीकांत जखमी झाल्याचे वृत्त आहे. कर्नाटकातील बंदिपूर नॅशनल पार्कमध्ये रजनीकांत हे शूट करत होते. न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शूटिंग दरम्यान रजनीकांत यांना गुडघा आणि खांद्याला दुखापत झाली आहे.

मॅन व्हर्सेस वाईल्ड या शोच्या शूटिंगसाठी 28 ते 30 जानेवारीपर्यंत दररोज 6 तास शूटिंग करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मंगळवारी पहिल्या एपिसोडचे शूटिंग सुरु होते. रजनीकांत यांच्यासोबत शूटिंग करण्यासाठी सुलतान बटेरी महामार्ग, मेलाहल्ली, मुद्दर आणि कल्केरे रेंज यासारख्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. एपिसोडची पूर्ण शूटिंग ही नॉन-टुरिझम झोनमध्ये होणार आहे. त्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, याआधी लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या शोमध्ये दिसले होते.

आपली प्रतिक्रिया द्या