पुन्हा ‘26/11’चा कट रचला जातोय! सडेतोड उत्तर देऊ: राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

मुंबईकर 26/11 रोजी दहशतकाद्यांनी हल्ला केला होता तसाच कट पुन्हा रचला जात आहे. तो आता यशस्वी होऊ देणार नाही. हिंदुस्थानातील शांतता कोणीही भंग करण्याचा प्रयत्न केला तर नौदलाकडून सडेतोड उत्तर दिले जाईल असा इशारा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या डॉकयार्डमध्ये तयार करण्यात आलेली संपूर्ण देशी बनावटीची, अद्ययावत ‘आय.एन.एस. खांदेरी’ ही पाणबुडी शनिवारी संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी सैन्य दल मजबूत व आधुनिक शस्त्रसाठा पुरविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. खांदेरीसारख्या अद्ययावत पाणबुडीमुळे हिंदुस्थानचे नौदल अधिक बळकट झाल्याचे त्यांनी सांगितले.
पाकिस्तान जगासमोर स्वतःचे हसे करून घेत आहे

जम्मू-कश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर संतप्त झालेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानवर दबाव आणण्यासाठी जगभरातील देशांचे दरवाजे ठोठावून पाहिले पण त्यांना कुणाचाही पाठिंबा मिळताना दिसत नाही. उलट जगासमोर पाकिस्तान स्वतःचे हसे करून घेत असून व्यंगचित्र निर्मितीसाठी सामग्री तयार करत असल्याची टीका संरक्षणमंत्र्यांनी केली.

पाणबुडीची वैशिष्टय़े
पर्मासीन मोटरच्या वापरामुळे आवाजच नाही
360 बॅटरींचा वापर (प्रत्येकी 750 किलो कजन)
4 पाणतीर (टॉर्पेडो), 2 क्षेपणास्त्र डागण्याची यंत्रणा
ताशी 20 नॉटिकल मैल वेगाने जाण्याची क्षमता
पाणबुडी सोडून बाहेर येण्याची खास व्यवस्था

आपली प्रतिक्रिया द्या