मॅन व्हर्सेस थलैवा! बेअर ग्रील्ससोबत झळकणार रजनीकांत

348
हिंदुस्थानचे सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. देशभरातून थल्लायव्वाचे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत.

डिस्कव्हरी वाहिनीवरील बेअर ग्रिल्सचा ‘मॅन व्हर्सेस व्हाइल्ड’ हा कार्यक्रम जगभरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमाचे जगभरातील 180 देशात प्रक्षेपण होते. या कार्यक्रमात याआधी पंतप्रधान मोदींसह जगभरातील दिग्गज राजकीय नेते आणि सुप्रसिद्ध कलाकारांनीही सहभाग नोंदवला आहे. त्यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत या कार्यक्रमात झळकणार आहेत.

बेअर ग्रिल्सचा डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस व्हाइल्ड’ हा कार्यक्रम निसर्गभ्रमंतीवर आधारित आहे. हा कार्यक्रम निसर्गाच्या सान्निध्यात फिरताना जर संकट आलं तर त्यातून बचाव कसा करायचा, याची प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी प्रसिद्ध आहे. 180 देशांहून अधिक देशात प्रसिद्ध होणाऱ्या कार्यक्रमात याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, अमिरेकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा, टेनिसपटू रॉजर फेडरर यांच्यासह हॉलिवूडच्या अनेक सुप्रसिद्ध कलाकारांनीही सहभाग नोंदवला आहे. त्यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत या कार्यक्रमात झळकणार आहे. पीएम मोदी यांच्या कार्यक्रमाच्या भागाचं चित्रीकरण उत्तराखंडच्या जिम कार्बेट पार्कात झालं होतं. तर रजनीकांत यांच्या कार्यक्रमाच्या भागाचं चित्रीकरण हे कर्नाटकमधील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती चेन्नईचे पत्रकार शब्बीर अहमद यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या