कंगनासारख्या नटवीने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणे हा विनोद

‘जेथे शेतीच केली जात नाही, अशा डोंगरावर जन्मलेल्या आणि शेतीशी काडीमात्र संबंध नसणाऱ्या कंगनासारख्या नटवीने शेतकऱ्यायांना दहशतवादी म्हणणे यासारखा दुसरा विनोद नाही,’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. ‘शेतकऱ्यावर टीका करणाNया नट आणि नट्यांना शेतकऱ्यांची मुले सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कंगनाच्या खारमधील घरातही अनधिकृत बांधकाम शुक्रवारी सुनावणी
अभिनेत्री कंगना राणावतच्या पाली हिलमधील अनधिकृत बांधकामाप्रकरणी उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आता शुक्रवार, 25 सप्टेंबरला होणार असून त्याच दिवशी तिच्या खारमधील घरातील अनधिकृत बांधकामावरील सुनावणीही दिंडोशी न्यायालयात होणार आहे. कंगनाने खारमधील घरातही 8 ठिकाणी अनधिकृत बांधकाम केले असून ते तोडण्याची न्यायालयाने परवानगी द्यावी, अशी याचिका पालिकेने दिंडोशी न्यायालयात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या