
कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरुद्ध आज उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये जनआक्रोश रॅलीत काढण्यात आली. या रॅलीत सामील होण्यासाठी गेलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. राकेश टीकेत यांची पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे येथे रॅलीत सहभागी होण्यासाठी आलेल्या लोकांनी त्यांना विरोध केला आणि धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीत त्यांची पगडी खाली पडली. प्रचंड विरतोधाच्या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत कार्यक्रमस्थळावरून निघून गेले.
यानंतरही जमाव त्याच्या गाडीपर्यंत त्याच्या विरोधात घोषणाबाजी करत राहिला. याबद्दल बोलताना राकेश टिकैत म्हणाले की, “हे फक्त काही लोकांचे षड्यंत्र आहे आणि ते पहलगाम हल्ल्याच्या निषेधात ट्रॅक्टर रॅली काढून करतील.” दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर राकेश टिकैत आणि नरेश टिकैत यांनी प्रश्न उपस्थित केले होते. यावरूनच त्यांना विरोध करण्यात आला, असं सांगण्यात येत आहे.