राखी सावंतने शेअर केला दुःखी व्हिडीओ, पतीने सोडलं की घटस्फोट?

2311

महिन्याभरापूर्वी बॉलीवूड अभिनेत्री राखी सावंतने लग्न केल्याचे जाहीर करून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. रितेश असे पतीचे नाव असल्याचेही तिने जाहीर केले होते. राखी संसारी झाली असे समजून तिच्या चाहत्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या. पण आता राखीने सोशल मीडियावर तिचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यात ती फारच दुःखी दिसत असून आपले हे दुःख ती चित्रपटातील गाण्यांमधून व्यक्त करताना दिसत आहे.


View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

राखीला उदास बघून तिचा घटस्फोट झाला की पतीने तिला सोडलं असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तसा प्रश्नही तिला काहीजणांनी विचारला आहे. पती तुला सोडून गेला का असे एकाने विचारले आहे. तर काहीजणांनी तुझा घटस्फोट झाला का असा प्रश्नही राखीला केला आहे. ‘तुम आज भी नहीं आओगे और तन्हाई फिर जीत जाएगी’ असा डायलॉग म्हणत  उदास गाणी गाताना राखी या व्हिडिओत दिसत आहे.


View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

28 जुलै रोजी राखीने मुंबईतील जे. डब्ल्यू. मॅरिएट या पंचतारांकीत हॉटेलमध्ये गुपचुप लग्न केले होते. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट करत ब्राईडल फोटोशूट असल्याचे जाहीर केले. पण नंतर रितेश या अनिवासी हिंदुस्थानी व्यक्तीबरोबर आपण लग्न केल्याचे तिने जाहीर केले होते. यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. पण पतीचा फोटो तिने आजपर्यंत सोशल मीडियावर पोस्ट केला नाही. यामुळे राखीचे लग्न हे तिच्या चाहत्यांसाठी कोडं असून आता तिने दुःखी व्हिडीओ पोस्ट करत खळबळ उडवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या