खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण, ट्वीट करून दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. रक्षा खडसे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वत: याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे.

रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता; माझा टेस्ट रिपोर्ट पोझिटिव्ह आला आहे. तरी गेल्या आठ दिवसात माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोविड चाचणी करुन घ्यावी. माझी प्रकृती स्थिर असून आपण सर्वांनी स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असे ट्वीट रक्षा खडसे यांनी केले आहे.

रोहिणी खडसेंही झाली होती कोरोनाची लागण

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचार घेतल्यानंतर त्या कोरोनामुक्तही झाल्या. आता त्यांच्या दुसऱ्या कन्येला कोरोनाची बाधा झाली आहे.