राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावर खर्च झालेल्या 124 कोटींचा देखील होणार तपास?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळ्याचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडून (SIT) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासह विविध कार्यक्रमांवर खर्च झालेल्या 124 कोटींहून अधिक रकमे बाबतही चौकशी सुरू करण्यात आल्याचे समजते. यातील 113 कोटींचा खर्च हा एकट्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर झालेला आहे.

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. या सोहळ्यावर तब्बल 113 कोटी रुपयांचा खर्च झालेला. या सोहळ्याला जवळपास 8000 पाहुणे उपस्थित होते.

या तपासामध्ये जानेवारी 2024 मधील महाकुंभ व्यवस्था आणि नोव्हेंबर 2025 मधील ध्वजारोहण सोहळा यांचा देखील समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटी गेल्या दोन वर्षांतील न्यासाच्या आर्थिक नोंदींचे ऑडिट (लेखापरीक्षण) करत आहे. हा खर्च न्यासाच्या ठरवून दिलेल्या आर्थिक नियमांनुसार आणि मंजुरीनुसार झाला आहे की नाही, हे तपासण्यासाठी तपास अधिकारी ऑडिट रिपोर्ट्स, पेमेंट व्हौचर्स, बिले, चार्टर्ड अकाउंटंटच्या (CA) नोंदी आणि खर्चाच्या विवरणांची कसून चौकशी करत आहेत.

सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, एसआयटी हा तपास एका व्यापक ऑडिट प्रक्रियेचा भाग म्हणून करत असून, आर्थिक गैरव्यवहारांबाबत अद्याप कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही.