
अयोध्येत प्रभु श्रीराम मंदिराच्या बांधकामत प्राचीन शैलीचा वापर केला जाणार आहे. हे मंदिर पुढील किमान एक हजार वर्षे भूकंप, वादळ यापासून सुरक्षित राहील अशा पद्धतीने बनविले जाणार आहे. त्यामुळे बांधकामात लोखंडाचा वापर केला जाणार नसून तांब्याच्या पट्ट्या वापरण्यात येतील. त्यासाठी रामभक्तांनी ताब्याच्या पट्ट्या दान कराव्यात, असे आवाहन श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने केले आहे. दरम्यान मंदिर निर्माण होण्यासाठी 36 ते 40 महिने लागणार आहेत. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टची बैठक आज दिल्लीत झाली.
– एलएन्डटी कंपनीकडे मंदिर बांधकामाची जबाबदारी आहे. एल अॅण्ड टी कंपनीचे इंजिनीअर आणि आयआयटीचे चेन्नईचे संशोधक माती परीक्षणाचे काम करीत आहेत.
– किमान हजार वर्षे भूकंप, वादळ यापासून मंदिर सुरक्षित राहिल

























































