राहुल गांधी पक्ष सांभाळू शकत नाही तर देश काय सांभाळणार- आठवले

1761
ramdas-athawale

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. ‘जे स्वत:चा पक्ष सांभाळू शकत नाही ते देश काय सांभाळणार’, अशा शब्दात रामदास आठवले यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी आठवले यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. ‘पाच वर्ष चांगल्या प्रकारे सरकार चालवून देखील काही लोकं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा खराब करायचा प्रयत्न करत आहेत. पण लोकांना कल्पना आहे की मोंदीव्यतिरिक्त आता काही पर्याय राहिलेला नाही. जे राहुल गांधी स्वत:चा पक्ष सांभाळू शकत नाही ते देशाचे सरकार कसं चालवतील? याचाच परिणाम म्हणून ते अमेठीमध्ये हरले’, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या