हिंसेमुळे आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन, रामदास आठवले करणार ट्रम्प तात्यांना फोन

रामदास आठवले - सामाजिक न्याय राज्यमंत्री

डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी सिनेट मध्ये घुसून धुडगूस घातला. यावर संपूर्ण जगातून अमेरिकेवर छी थू झाली. पंतप्रधान मोदी यांनीही या घटनेची निंदा केली असून आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही ट्रम्प यांना फोन करून समज देणार असल्याचे म्हटले आहे.

आठवले म्हणाले की, मी मी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलेन. त्यांच्यामुळे आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. नाशिक मध्ये बोलताना आठवले म्हणाले की हिंसा ही चुकीची आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे असे आठवले म्हणाले.

बुधवारी अमेरिकेच्या संसदेत जो बायडेन यांना अधिकृतरित्या विजयी घोषित करण्यात येणार होते. मात्र त्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेत घुसून मोठा गोंधळ केला. या समर्थकांनी संसदेत तोडफोड केली व पोलिसांवर रासायनिक द्रव्ये फेकली. तसेच दोन समर्थकांकडून स्फोटके देखील जप्त करण्यात आली आहेत. यावेळी समर्थक पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत एका महिलेचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. या ट्रम्प समर्थकांसोबत रिपब्लिकन पक्षाचा एक खासदार देखील होता असे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या