भांडुपमधील रस्त्यांचे रुंदीकरण करा!

भांडुपमधील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी महत्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण तातडीने केले जावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार रमेश कोरगावकर यांनी विधानसभेत केली.

भट्टीपाडा जंगलमंगल रोड येथील अरुंद रस्ता जो खोत रोड आहे त्याचे रुंदीकरण प्राधान्याने करण्याची गरज आहे. त्यासाठी मी दोन वर्षांपासून पाठपुरावा करतोय. त्याचप्रमाणे आदित्य हॉटेलच्या बाजूला कैकय्या अचला मार्ग, केदारी भुवन ते ऍन्थनी चर्च तुळशीपाडा लेक रोड, लाला शेख कंपाऊंड ते कोकण नगर या रस्त्यांच्या रुंदीकरणाचीही तातडीची गरज असल्याचे कोरगावकर म्हणाले.