इराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक

735

सामना ऑनलाईन । लंडन

इराणने होरमुज आखातात ब्रिटनचे एक तेलाचे जहाज जप्त केले आहे. या घटनेमुळे पाश्चिमात्य देश आणि इराणमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. या जहाजातील 23 कर्मचार्‍यांनी अटक करण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांमध्ये 18 हिंदुस्थानी कर्मचार्‍यांचा समावेश आहे. तसेच इतर कर्मचारी हे रशिया, लातविय आणि फिलीपाईन्सचे नागरिक आहेत.

इराणच्या सैनिकांनी ब्रिटनचा झेंडा असलेले एक जहाज हेलिकॉप्टर्स आणि चार नौकांच्या मदतीने घेरले आणि ते जप्त केले. इराण सैन्याने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्री जलमार्ग कायद्याचा भंग केल्याने हे जहाज जप्त केले आहे.

अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना सोडवण्यासाठी केंद्र सरकारने इराणशी संपर्क साधला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हटले की, हिंदुस्थानी नागरिकांना देशात आणणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी आम्ही इराण सरकारच्या संपर्कात आहोत.

आपली प्रतिक्रिया द्या