राणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई

मनी लॉण्डरिंग प्रकरणी अटकेत असलेले येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या लंडन येथील घरावर अखेर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्तीची कारवाई केली आहे. लंडन येथील या घराची किंमत 127 कोटींच्या घरात असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आलेली आहे. मनी लॉन्ड्रिंग कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीने यावेळी स्पष्ट केले आहे.

ईडीच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार राणा कपूर यांनी 2017 साली 93 कोटी रुपयांना या घराची खरेदी केली होती. डिओट क्रिऐशन जर्सी लिमिटेड या नावावर या घराची खरेदी केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. दरम्यान, कपूर यांना ईडीकडून 7 मार्च रोजी अटक करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या