विलेपार्लेत आज रंग बरसे

379


 महानायक अमिताभ बच्चन आणि एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिग्नेचर टय़ून्सच्या वतीने सुशांत धोंड यांनी ‘रंग बरसे’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गुरुवार, 10 ऑक्टोबरला विलेपार्ल्याच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात रात्री 8.30 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. रेखा आणि अमिताभ यांच्या 50 वर्षांच्या कारकीर्दीमधील अनेक सुमधुर गाणी आलोक काटदरे, शैलजा सुब्रमणीयम, मोना कामत-प्रभुगावकर, आशीष श्रीवास्तव सादर करणार आहेत. अनुपम घटक यांच्या मार्गदर्शनाखाली 18 प्रसिद्ध वादक 4 समूह गायक त्यांना साथ देतील.

आपली प्रतिक्रिया द्या