कंगनाच्या बहिणीने केली आलियाची मस्करी, नेटकऱ्यांनी झोडपले

976

अभिनेत्री कंगना रणौत हिला नुकताच पद्मश्री हा सन्मान जाहीर झाला. त्यामुळे तिचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. अभिनेत्री आलिया भट हिनेही कंगनाचं अभिनंदन केलं आहे. पण, कंगनाची बहीण रंगोली हिने आलियाची मस्करी केल्याने नेटकऱ्यांनी रंगोलीला ट्रोल केलं आहे.

आलिया हिने पद्मश्री सन्मानाची घोषणा झाल्यानंतर कंगनाला अभिनंदन करणारा एक बुके पाठवला. त्या बुकेचा फोटो रंगोलीने सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यावर कॅप्शनही दिली. हे पाहा आलिया यांनी कंगनाला फुलं पाठवली आहेत. कंगनाचं माहीत नाही, पण मला खूप मजा येतेय असं तिने या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. त्याच्यापुढे एक हसणारा इमोजीही टाकला आहे.

या फोटोला पाहून नेटकऱ्यांच्या संतापाचा पारा चढला. त्यांनी रंगोलीला ट्रोल करायला सुरुवात केली. आलिया ही एक उत्तम आणि संवेदनशील व्यक्ती आहे. तिच्याप्रति असणारा आदर आज वाढला, अशा अर्थाचे रिप्लाय नेटकऱ्यांनी रंगोलीला दिले. तसंच काहींनी रंगोलीला तिच्या नकारात्मक विचारसरणीसाठीही खडसावलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या