‘ही माझी शेवटची पोस्ट’, म्हणत सुपरस्टार अभिनेत्रीने घेतला सोशल मीडियावरून ब्रेक

बॉलिवूड, टॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटी सोशल मीडियावर सक्रिय असतात. वेगवेगळ्या पोस्टमधून ते आपल्या भावना व्यक्त करतात आणि चाहत्यांशी कनेक्ट राहतात. यातील एक नाव भोजपुरी सुपरस्टार अभिनेत्री राणी चॅटर्जी हिचेही आहे. सोशल मीडियावर लाखो चाहते असलेल्या राणीने मात्र चाहत्यांना धक्का देत सोशल मीडियावरून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

rani-chatterjee-bhojpuri

इन्स्टाग्राम, फेसबुकवर राणी चॅटर्जी हिचे लाखो फॉलोअर्स आहेत. फोटो, व्हिडीओ, वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून ती चाहत्यांशी कनेक्ट राहते. चाहते तिच्या पोस्टची आतुरतने वाट पाहात असतात. मात्र आता ही आतुरता आणखी ताणली जाणार आहे. कारण राणी चॅटर्जी हिने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत तिने स्वत: पोस्ट शेअर करत माहिती दिली.

rani-chatterjee-bhojpuri-ac

‘कदाचित सोशल मीडियावरील ही माझी शेवटची पोस्ट असेल. काही दिवसांसाठी मी ब्रेक घेत आहे. लवकरच नवीन उर्जेने पुनरागमन करेन’, अशी पोस्ट राणी चॅटर्जी हिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

दरम्यान, इन्स्टाग्रामवर राणी चॅटर्जी हिचे जवळपास 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टला हजारो लोकं लाईक, कमेंट करतात. मात्र आता तिने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतल्याने चाहते नाराज झाले आहेत. तिने हा निर्णय नक्की का घेतला याबाबत तिने खुलासा केलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या