रांजणी ता. आंबेगाव येथे येथील नरेंद्र वाघ यांच्या घराला अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत घरात असलेल्या लोखंडी कपाटातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. याबाबत नरेंद्र वाघ यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रांजणी येथे नरेंद्र वाघ त्यांच्या कुटुंबासमवेत राहत असून दिनांक 8 रोजी ते पिंपळगाव खडकी या ठिकाणी त्यांच्या काकांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी त्यांचे रांजणी येथील बंद घराला आग लागली असल्याची त्यांच्या बहिणीने फोन करून कळवले. नरेंद्र वाघ घरी गेले असता त्यांनी तात्काळ घराचा दरवाजा उघडून खिडक्या दरवाजा उघडून हवा मोकळी केली. व घरातील गॅस टाकी बाहेर ओट्यावर आणून ठेवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र आगीत घरात असलेल्या कपाटातील शैक्षणिक कागदपत्रे, जमिनी संदर्भातील कागदपत्रे, वडिलांची सर्व कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. तसेच कपाटाच्या बाजूला असलेले कपडे व इतर साहित्य जळून गेले आहे. यात सुमारे त्याचें 80 ते 90 हजार रुपयांचे नुकसान झाले असून सदर आग ही अज्ञात व्यक्तीने लावली असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती करतात पण जर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करत पंचनामा केला आहे. याबाबत नरेंद्र वाघ व त्यांची पत्नी सुप्रिया वाघ यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.