
बलाढय़ मुंबई संघाला बुधवारी रणजी करंडक अंतिम लढतीच्या पहिल्या दिवशी चांगल्या सुरुवातीनंतर धावांसाठी जोरदार संघर्ष करावा लागला. कर्णधार पृथ्वी शॉ (47) आणि यशस्वी जैसवाल (78) या जोडीने मुंबईला 87 धावांची सलामी दिल्यानंतर मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी लढतीत पुनरागमन केले आणि मुंबईला दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 248 धावांवरच रोखले. आता मुंबईच्या डावाला आकार देण्याचे काम सर्फराज खान (नाबाद 40) आणि शम्स मुलानी (नाबाद 12) या जोडीला करावे लागणार आहे. एम.पी.च्या वतीने अनुभव अगरवाल 56 धावांत 2 विकेट आणि सारांश जैन 31 धावांत 2 विकेट यांनी मुंबईच्या डावाला जोरदार धक्के देत आपल्या संघाला लढतीत पुन्हा आणले.
संक्षिप्त धावफलक
पहिला डाव – 90 षटकांत 5 बाद 248 (पृथ्वी शॉ 47, यशस्वी जैसवाल 78, सर्फराज खान खेळत आहे 40, शम्स मुलानी खेळत आहे 12; अनुभव अगरवाल 56 धावांत 2 विकेट, श्रेयांस जैन 31 धावांत 2 विकेट, कुमार कार्तिकेय 91 धावांत 1 विकेट).



























































