रानू मंडलचा ‘तो’ फोटो खोटा, मेकअप आर्टिस्टने शेअर केला ओरिजनल फोटो

2522

सोशल मीडियामुळे एका रात्रीत प्रसिद्ध झालेली गायिका रानू मंडल हिला तिच्या मेकअप वरून नेटकऱ्यांनी बरेच ट्रोल केले होते. मेकअप आर्टिस्टने रानूचा केलेला पांढरा फटक मेकअपने ती फारच वाईट दिसत होती व त्यावरून नेटकऱ्यांनी तिची चांगलीच खिल्ली उडवलेली. मात्र रानूचा मेकअप करणाऱ्या आर्टिस्टने तिचा तो फोटो खोटा असल्याचे सांगितले आहे. तसेच त्या आर्टिस्टने रानूचा ओरिजनल फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.


कानपूर येथील एका ब्युटी पार्लरच्या फॅशन व मेरकअप शोमध्ये रानूने रॅम्पवॉक केला होता. त्या रॅम्पवॉकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात रानूने क्रिम रंगाचा लेंहेंगा घातला होता व अतिभडक मेकअप केला होता असे त्या व्हिडीओत दिसत आहे. मात्र तो मेकअप रानूचा खऱा मेकअप नसून तिचा चेहरा बिघडविण्यात आल्याचे त्या मेकअप आर्टिस्टचे म्हणने आहे.


रानूची मेकअप आर्टीस्ट संध्या यांनी इंस्टाग्रामवरून तिच्या मेकओव्हरचा व्हिडीओ व तिच्या खऱ्या मेकअपचा फोटो देखील शेअर केला आहे. संध्याने शेअर केलेला फोटोत रानूचा मेकअप खूप चांगला झालेला दिसत आहे. त्यामुळे रानूला ट्रोल करण्यासाठीच कुणीतरी अशा प्रकारे तिचा फोटो खराब करून व्हायरल केल्याचे बोलले जात आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या