रणवीरने कमवली जबरदस्त बॉडी

1156

अभिनेता रणवीर सिंह त्याची लॉकडाऊन डायरी बऱयाचदा चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. त्यामुळे ‘रणवीरचं चाललंय काय’ याची अपडेट फॅन्सला मिळत असते. आता तर रणवीरने आपली अपडेट देताना भल्याभल्यांना करंट दिला आहे. त्याने जबरदस्त बॉडी ट्रान्फर्मेशन केलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. त्याचे वाढलेलं वजन, पिळदार स्नायू आणि चेहऱयावरचा रावडी भाव बघून चाहते फारच फिदा झालेत. जरा सुजल्यासारखा वाटतोय, पण लवकरच वजन कमी करेन, अशी कॅप्शन रणवीरने लिहिलेय.

रणवीरच्या सिक्स पॅक फोटोवर बॉलीवूड स्टारकडूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे. मनीष पॉल याने तर ‘भावा, असं करू नकोस’, अशी मजेशीर कंमेंट केलेय. त्यावर रणवीरने दिलेले उत्तर कमालीचे व्हायरल झालंय. अरे काही कामधंदा नाही, बसून बसून काय करणार, वर्कआऊट करा आणि दाबून खा, दुसरं काय! असं रणवीरने लिहिलंय.


View this post on Instagram

Felt swole, might delete later @bigmuscles_nutrition

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

आपली प्रतिक्रिया द्या