राष्ट्रवादीचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात महिलेचा तक्रार अर्ज, बदनामी करण्याचा प्रयत्न; धनंजय मुंडे यांचा खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर परिचयाच्या एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. या महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दिला आहे. याबाबत महिलेने प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा मंत्री धनंजय मुंडे यांनी केला. ‘माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असून माझी बदनामी करणारे तसेच मला ब्लॅकमेल करणारे आहेत’ असे धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

#समाजमाध्यमांमध्ये_माझ्या_विरुध्द_होणारे_आरोप #पूर्णपणे_खोटे_बदनामी_आणि_ब्लॅकमेल_करणारे_आहेत

कालपासून समाज…

Posted by Dhananjay Munde on Tuesday, January 12, 2021

धनंजय मुंडे यांनी याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करणारा खुलासा केला. फेसबुक पोस्टमध्ये मुंडे म्हणतात, एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे पुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधांमधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांचा पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे पुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना पुटुंबीय म्हणून सामावून घेतले आहे.

या मुलांची सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसायासाठी मदत केलेली आहे. या सर्व पृती मी सद्भावनेने केल्या असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

ब्लॅकमेल करून पैशाची मागणी

2019 पासून सदर महिला व तिची बहीण यांनी मला ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीवाला गंभीर शारीरिक इजा पोहोचवण्याच्या धमक्यासुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ देखील सहभागी होता. मोबाईलवरून ब्लॅकमेलिंग करीत कोटय़वधी रुपये मागितल्याचे एसएमएसचे पुरावे माझ्याकडे आहेत. या प्रकरणाची संबंधितांकडून योग्य चौकशी केली जाईल, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या