11 वर्षाच्या मुलावर महिलेने केला बलात्कार, त्याच्या मुलाला देखील दिला जन्म

47129

एका 22 वर्षीय महिलेने 11 वर्षाच्या मुलावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ती महिला त्या मुलाच्या बाळाची आई देखील झाली आहे. मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे. मेरिसा मौरी असे त्या नराधम महिलेचे नाव आहे. हा प्रकार उघड झाल्याने मुलाच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

merisa-mori

आज तक या वृत्त संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे बुधवारी स्थानिक न्यायालयाने मेरिसाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल पाच वर्षांपूर्वी पीडित मुलाला सांभाळण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी मेरिसाला घरी आणले होते. ती महिला दिवसभर त्या मुलासोबत घरात एकटीच असायची. संध्याकाळी त्याचे आई वडील कामावरून आल्यानंतर ती तिच्या घरी जायची. मात्र मुलासोबत दिवसभर घरात एकटं राहण्याचा फायदा घेत तिने त्याच्यावर अनेकदा बलात्कार केले. तसेच याबाबत कुणाला सांगितल्यास त्याला जीवे मारून टाकण्याची धमकी देखील दिली. मेरिसा गरोदर राहिली तेव्हा तिने ते बाळ तिच्या बॉयफ्रेंडचे असल्याचे कुटुंबियांना सांगितले.

दरम्यान तब्बल सहा महिन्यात तब्बल 15 वेळा अत्याचार सहन केल्यानंतर त्या मुलाने याबाबत त्याच्या आईला सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मेरिसाला अटक केली. त्यावेळी झालेल्या चौकशीत मेरिसाने तिचं मुल देखील त्या मुलाचे असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या