चंद्रपूरमध्ये अल्पवयीन मुलाचा पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार

1030

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील बिबी या गावातील एका पाच वर्षांच्या मुलीवर 15 वर्षांच्या मुलाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेतील आरोपी अल्पवयीन आहे. बीबी गावातील रामनगर कॉलनीतील ही घटना आहे. पीडित मुलीला घरी नेऊन तिच्यावर मुलाने बलात्कार  केला. मुलगी घरी रडत आली, तेव्हा पालकांनी विचारपूस केल्यावर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या वडिलांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपी मुलावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. आरोपी मुलगा इयत्ता नववीत तर पीडित मुलगी ही पहिलीत शिकत आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. मुलाने मोबाईलवर अश्लील चित्रफीत बघितल्याने ही घटना घडल्याचे पिरसरातील नागरिकांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या