भयंकर! केरळमध्ये 75 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, प्रकृती गंभीर

1980

केरळमध्ये एका 75 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाला आहे. पीडित महिलेला रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

एर्नाकुलमध्ये एका 75 वर्षीय महिलेवर एका ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केला आहे. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पण्ण झाले आहे. महिलेच्या गुप्तांगांना गंभीर जखम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच पीडित महिलेवर उपचार सुरू आहे. महिलेचे वय झाल्याने विसरण्याचा आजार जडला आहे. त्या सातत्याने वेगगळ्या गोष्टी सांगत आहेत, त्यामुळे आरोपीला शोधण्यास पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत आहेत. पीडित महिलेने आतापर्यंत जे काही सांगितले त्यावर आधारित पोलीस तपास करत आहेत.

या प्रकरणी राज्याच्या महिला आयोगाने जातीने लक्ष घातले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा एमसी जोसेफिन यांनी रुग्णालयाचा दौरा करून पीडित महिलेची भेट घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा कसोशीने शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या