धक्कादायक…दापोलीत 90 वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार

दापोली तालुक्यातील पालगड परिसरात एका गावात 90 वर्षांच्या वृद्ध महिलेवर परराज्यातील एका नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पालगड परिसरातील एका गावातील 90 वर्षांची महिला 19 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घरात एकटी असताना आरोपी सोहन अमरचंद्र भिल (रा.सलेर, पो.धंगरार,ता.चितोडगड, राजस्थान. सध्या रा.शिरखल ता.दापोली) याने दरवाजा उघडा असल्याचे बघितले. तो घरात शिरला आणि वद्ध महिला एकटीच असल्याचे पाहून तिला दम देत तिच्यावर अतिप्रसंग केला.

परिसरातील क्रशरवरील कामगारांचे फोटो पाहून पीडित महिलेने संशयित आरोपीला ओळखले आहे. या घटनेने वृद्ध महिलेला मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे नातेवाईकांनी शनिवारी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पी.ए. हिरेमठ करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या