गतिमंद तरुणीवर अज्ञाताचा बलात्कार

570
rape

जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे एका 22 वर्षीय गतिमंद तरुणीवर बलात्कार करण्यात आला असून पीडितेला त्यातून दिवस गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडितेला त्रास होत असल्याने घरातल्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पिडीत तरुणी आजोबांबरोबर त्यांच्या गावी इनामगाव ता. शिरुर जिल्हा पुणे या ठिकाणी राहत होती. पण गेल्या काही दिवसांपासून तिची तब्येत सतत बिघडत असल्याने तिला घरच्यांनी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय चाचणीत ती गर्भवती असल्याचे समोर आले.हे ऐकून तिच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमिनच घसरली. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे हे करत आहेत. यानंतर सदरची घटना ही पुणे जिल्ह्य़ातील शिरुर तालुक्यात घडली आसल्याने सदरचा गुन्हा तपासकामी जामखेड पोलिसांनी शिरुर पोलीस स्टेशन जिल्हा पुणे ग्रामीण यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या