रुग्ण वाढणाऱया वॉर्डमध्ये रॅपिड ऍक्शन प्लॅन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी बाधितांचा शोध वेगाने घेऊन कार्यवाही करण्यासाठी पालिकेने दररोजच्या चाचण्यांची संख्या 9 हजारपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा वेग 28 ते 45 दिवसांपर्यंत असणाऱया बोरिवली, मुलुंड, दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, मरीन लाइन्स, खार-वांद्रे पश्चिममध्ये नियमित चाचण्यांबरोबरच 15 मिनिटांत अहवाल देणाऱया दररोज 250 अँटीजन चाचण्या करण्यात येणार आहेत.

दक्षिण मुंबईत सध्या कोरोना नियंत्रणात आला असला तरी मुलुंडसह उत्तर मुंबईतील काही भागात रुग्णवाढ अद्याप आवश्यक त्या प्रमाणात आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढवून कंटेनमेंट झोनमध्ये नियमांची कठोर अंमलबजावणी, प्रभावी क्वारेंटाइन आणि निर्जंतुकीकरण करून कोरोना रोखण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले. यासाठी ‘रॅपिड ऍक्शन प्लान’ तयार करण्यात आला असून कार्यवाही सुरू करण्यात आल्याचेही चहल म्हणाले. यामध्ये काल मुंबईतील आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणचे 6 हजार 700 चाचण्या झाल्याचेही ते म्हणाले. यानुसार रुग्णवाढ असणाऱया प्रत्येक वॉर्डात वाढिव 250 चाचण्या करून मुंबईतील दररोज होणाऱया चाचण्यांची संख्या 9 हजार करण्यात येणार असल्याचे सांगितले.

आतापर्यंत 4 लाख 8 हजार चाचण्या
– मुंबईत 14 जुलैपर्यंत 4 लाख 8 हजार 320 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर 36 लाख 8 हजार 453 घरांना भेटी देऊन तपासणी, ािक्रिंनगची कार्यकाही करण्यात आली आहे. यामध्ये सहा लाख ज्येष्ठ नागरिकांची तपासणीही करण्यात आली आहे. यामध्ये ऑक्सिजन पातळी 95 पेक्षा कमी असलेल्या अडीच हजार ज्येष्ठ नागरिकांना तातडीने आकश्यक औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली.