बंगळुरूमध्ये रॅपिडो रायडरला मुलीची छेड काढल्याप्रकरणी अटक

कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे एका रॅपीडो रायडरने राईडदरम्यान तरुणीची छेड काढली. त्याने राईड सेवेदरम्यान तरुणीच्या पायांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तिने या प्रकाराचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकून हा भयंकर अनुभव कथन केला. या प्रकरणी बंगळुरू पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पीडित तरुणी पीजी म्हणून राहते. तेथे जाण्यासाठी तिने चर्च स्ट्रीट येथून रॅपिडो राईड बुक केली होती. राईडदरम्यान चालकाने तिच्या पायांना कोपराने स्पर्श करण्याचा वारंवार प्रयत्न केला. संशय आल्यामुळे तिने व्हिडीओ रेकॉर्ड केला. पुन्हा त्याने पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच ती त्याला म्हणाली, ‘भाऊ तू काय करतोय? थांबव हा प्रकार.’ मात्र, तो थांबला नाही. मी शहरात नवीन असल्याने त्याला थांबण्यास सांगू शकत नव्हती, असे तरुणीने म्हटले आहे.