
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉम्बे टॉकीज या चित्रपट निर्मितीतील ख्यातनाम कंपनीने अनेक सुपरहिट हिंदी चित्रपट रसिकांना दिले आहेत. लवकर बॉम्बे टॉकीजवर ‘राष्ट्रपुत्र’ हा चित्रपट घेऊन येत आहे. ‘राष्ट्रपुत्र’चे ट्रेलर नुकतेच अलाहाबादच्या पी. व्ही. आर. विनायकमध्ये प्रदर्शित करण्यात आले. क्रांतिकारकाचे गुरू आणि सर्जिकल स्ट्राइकचे कमांडर म्हणून ओळखले जाणारे चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनावर हा भव्य चित्रपट आहे. हिंदी भाषेव्यतिरिक्त संस्कृत, इंग्रजी, तेलगू, तमीळ, पंजाबी अशा 26 भाषांमध्ये ‘राष्ट्रपुत्र’ प्रदर्शित होणार आहे. ‘राष्ट्रपुत्र’च्या माध्यमातून बॉम्बे टॉकीज पुन्हा एकदा धमाकेदार पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. 28 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, असे निर्माता आझाद यांनी सांगितले.


























































