दोन–तीन नव्हे, चार मुले हवीत!संघाचे प्रचारक सतीश कुमार यांचे वादग्रस्त विधान

देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सतीश कुमार यांनी लोकांनी जास्तीत जास्त मुले जन्माला घातली पाहिजे, असे वादग्रस्त विधान केले आहे. दोन-तीन नव्हे, तर चार मुले असली पाहिजेत, असे सांगत मोठय़ा कुटुंबाचे समर्थन केले आहे.

जयपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात संतोष कुमार म्हणाले, संशोधनानुसार ज्या देशांमध्ये युवकांची संख्या कमी आहे तिथे जीडीपी घसरत चालला आहे. त्यामुळे आपल्या देशात युवकांची संख्या जास्त असायला हवी. 2047 मध्ये भारत देश एक विकसित देश बनेल. त्यावेळी आपल्याला म्हाताऱयांचा देश व्हायचे नाही, तर आपली लोकसंख्या ही युवा असली पाहिजे. त्यासाठी आपले कुटुंब छोटे नव्हे, तर मोठे असले पाहिजे, असे ते म्हणाले. पाच-सहा मुले जन्माला घातली पाहिजेत या गोष्टीची मी वकिली करत नाही; परंतु दोन किंवा तीन मुले नक्कीच पाहिजेत. चार मुले असणेसुद्धा चांगली गोष्ट आहे.