‘माझ्या नवऱ्याची बायको’ घेणार मालिकेसोबत घटस्फोट?

117

सामना ऑनलाईन । मुंबई

छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतीन खलनायिका शनाया ही व्यक्तिरेखा चांगलीच लोकप्रिय झाली आहे. शनायाची कारस्थानं पाहता ती गुरुच्या आयुष्यातून जाईल असं काही वाटत नाहीये. पण, शनाया साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील मात्र या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. तिला फिल्ममेकिंग आणि दिग्दर्शनाच्या अभ्यासासाठी न्यूयॉर्कला जायचं आहे. त्यामुळे ती रसिक प्रेक्षकांना निराश करून या मालिकेतून एक्झिट घेणार आहे, असं बोललं जात आहे.

रसिकाने गेल्या वर्षी अमेरिकेमध्ये दिग्दर्शन आणि फिल्ममेकिंगसाठी अर्ज केला होता. तिला या वर्षी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे तिला आता ही मालिका सोडावी लागणार, अशी चर्चा सध्या रंगत आहे. सध्या ही मालिका रंगतदार वळणावर आली आहे. राधिका आणि गुरू सध्या एकमेकांच्या समोर घटस्फोटासाठी उभे ठाकले आहेत. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनाला लागली आहे. माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. पण, आता रसिका ही मालिका सोडून गेली, तर या लोकप्रिय भूमिकेसाठी नवीन कोण आणायचं हा प्रश्न निर्मात्यांसमोर उभा राहू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या