Video – संसदेत घुसला उंदीर, खासदारांची पळापळ

स्पेनमध्ये मतदानादरम्यान संसदेत भला मोठ उंदीर घुसला. त्यामुळे उपस्थित खासदारांची एकच पळापळ झाली. अखेर हा उंदीर पकडण्यात आला असून त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुसना डायझ यांच्या नियुक्तीवर संसदेत चर्चा मतदान होणार होते. तेव्हा अध्यक्षा मार्टा बॉस्केट बोलत होत्या. तेव्हा अचानक त्यांना एक मोठा उंदीर दिसला, तेव्हा संसदेत सर्व खासदारांची पळापळ झाली, अनेकांनी आपल्या खुर्च्या सोडल्या तर अनेकजण टेबलवर उभे राहिले. अखेर संसदेतील कर्मचार्यां्नी हा उंदीर पकडला आणि बाहेर जाऊन सोडून दिला. दरम्यान रॉयटर या वृत्तसंस्थेने या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून तो चांगलच व्हायरल झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या