उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने देश-विदेशातून शोक व्यक्त केला जात आहे. अशातच आता समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शोक व्यक्त केला आहे. सोबत त्यांनी रतन टाटा यांच्यासोबतचा 8 वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.
जिन्होंने सिखाया कैसे उसूलों के साथ कारोबार किया जाता है, अपने लाभ को कल्याण के लिए लगाया जाता है, ऐसे महान रतन टाटा जी का जाना इतिहास के एक पन्ने का पलट जाना है।
भावभीनी श्रद्धांजलि! pic.twitter.com/nwfuyJ6mOd
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) October 10, 2024
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दीर्घ आजाराने बुधवारी रतन टाटा यांचे निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘सिद्धांतांसह व्यवसाय कसा करायचा आणि आपला नफा कल्याणासाठी कसा गुंतवायचा हे शिकवणाऱ्या महान रतन टाटांचे निधन म्हणजे इतिहासाचे एक पान उलटले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अखिलेश यादव यांनी आपल्या या पोस्टसोबत रतन टाटा यांच्यासोबतचा 8 वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे.