
रेशन देण्याच्या बहाण्याने एका महिलेवर घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला आहे. उत्तर प्रदेशमधील ही घटना असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आला आहे. य काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. या परिस्थितीचा गैरफायदा घेत उत्तर प्रदेशमधील शामली शहरातील एक रेशन दुकानदार विनोदच्या दुकानात एका महिला आली. तेव्हा राशन संपले असून तुम्हाला घरी आणून देतो असे त्याने सांगितले. रेशन देण्याच्या बहाण्याने विनोद महिलेच्या घरी गेला. घरात महिलेला एकटे पाहूने विनोदने महिलेवर बलात्कार केला. तसेच याबाबत कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. लॉकडाऊनमुळे महिलेचा पती पंजाबमध्ये अडकला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.




























































