रत्नागिरी- आणखी 14 रूग्ण सापडले, कोरोनाने घेतला सातवा बळी

383

मिरज येथून प्राप्त झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 122 तपासणी अहवालांपैकी 14 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 272 वर पोहचली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता 7 झाली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात रत्नागिरी- 4, लांजा-3, गुहागर-3, कामथे-3 आणि दापोलीतील 1 रूग्णाचा समावेश आहे.यातील 04 रुग्ण कोव्हीड केअर सेंटर रत्नागिरी येथे दाखल आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 272 वर पोहचली आहे.165 रूग्ण उपचार घेत असून 98 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या